शैक्षणिक वर्ष २०१५-२०१५ म्हणजेच जून २०१५-एप्रिल२०१६ दरम्यान भारतातील शालेय विद्यार्थांसाठी आम्ही राबवत असलेल्या एका प्रकल्पाबद्दल हा लेख आहे. महाराष्ट्रातील काही शाळा नि संस़्थांत हा प्रकल्प राबवला जात आहे. देश-विदेशात कार्यरत करणार्या माझ्या तरूण मराठी संशोधक मित्रांनी शालेय मुलांसाठी लेख लिहीले आहेत. ही पोस्ट लिहीण्यामागे कारण हे की:
१. आम्हाला भाषांतर करणारांची गरज आहे. काही लेख इंग्रजीत आहेत, तर काही मराठीत. मराठीतील लेख इंग्रजीत नि इंग्रजीतील लेख मराठीत भाषांतरीत करण्यासाठी, भाषांतर करणारे हवे आहेत.
२. जर हा प्रकल्प तुम्हाला ओळखीच्या शाळेत, गावी किंवा इतरत्र कुठेही राबवायचा असेल, तर मला जी-मेल वर लिहा. दर महिन्यास एक लेख तुम्हाला पोचता केला जाईल.
३. तुम्हाला प्रकल्पात सहभागी व्हावयाचे असल्यासही मला मेल लिहा. मात्र लिखाणबाबात आम्ही बरेच काटेकोर आहोत. लिखाणातील कल्पना अपारंपारीक असल्यास फारच उत्तम!
एकूणच प्रकल्पात कोणताही पैसा गुंतलेला नाही. लिखाणाबद्दल-भाषांतराबद्दल आम्हीही काहीही देऊ शकणार नाही. आपणास प्रकल्प राबवायचा असेल, तर तो स्वखर्चाने करावा लागेल. या प्रकल्पातील लेख वापरून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करू नये. सुदैवाने, काही चांगली कायदेशीर मंडळी प्रकल्पाशी निगडीत आहेत.
जून ११, २०१५ पासून लेख पाठवायला सुरूवात केली आहे. पाठवलेले लेख वाचण्यसाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा:
इथे टिचकी मारा.
वरील दुव्यावर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवा लेख टाकला जाईल आणि आपण तो वाचू शकता नि डाउनलोडही करू शकता.
इथे टिचकी मारा.
वरील दुव्यावर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवा लेख टाकला जाईल आणि आपण तो वाचू शकता नि डाउनलोडही करू शकता.
२००९ M.Sc. संपल्यापासून मित्रमंडळींना घेऊन महाराष्ट्रातील खेड्यांमधील शाळांत जाऊन शिबीर घेण्याचा उपक्रम २०१३ पर्यंत मी नेटाने चालवला. मात्र, पुढेपुढे भारतभेटही लांबली. मित्र वेगवेगळ्या ठिकाणी गेले नि उपक्रम सिद्ध करणे त्रासदायक होऊ लागले. २०१३मधे तर एका गावाला भेट द्यायला निघालो, नि पुरामुळे गावत जाणे सुद्धा शक्य झाले नाही! या वेळी लोकांची जमवा जमव करायलाच तीन महिने खर्ची पडले होते! या अडचणींमुळे, शालेय विद्यार्थ्यांकरीता शिबीर घेण्याऐवजी काहीतरी वेगळे, ठोस नि "permanent" करायचे असा विचार सुरू झाला.
वर्षातून एकदा शाळेला भेटी देणे हे उत्सवासारखे झाले आहे. मुलांचा जास्त फायदा करायचा असेल तर सतत त्यांच्या मेंदूला खाद्य देणे गरजेचे आहे. थेंब थेंब पाण्याने काताळाला खळगा पडतो तसा. आपले १० लेख त्याचं शालेय वर्षासाठी पुरेसे आहेत.
अखेरीस एक कल्पना सुचली.
कल्पना:
मी इथे गणितावर मराठीतून blog लिहित होतो. शंतनूने देखील त्याच्या भौतिकशास्त्राबाबतचे काही सुंदर लेख त्याच्या ब्लॉगवर लिहिले आहेत. या लेखांचा दुवा- http://shantanubhat.blogspot. de.
मी आणि माझा अभिजित बोरकरने भौतिकशास्त्रावर मराठीतून लेख लिहिण्याचा संकल्प केला होता. हा लेखनोद्योग अधिक व्यापक करायचा नि कमीत कमी आठ उत्तम लेख निर्माण करायचे. गावाकडील ज्या शाळांसोबत संबंध आहेत, त्यांना दरमाह एक लेख पाठवायचा. आर्थिक मदत मिळाली तर ८वी-९वी-१०वी-११वी-१२वी च्या शक्य तेवढ्या मुलांना या लेखाच्या छापील प्रती वाटायच्या. अशी कल्पना आहे.
लेख शक्यतो असा लिहिवा की वृत्तपत्र वाचता येणार्या वयोगटातली जास्तीत जास्त व्यक्ती तो समजू शकतील. साधारणपणे २-४ पानांत लेख लिहून पूर्ण करावा म्हणजे वाचकाला कंटाळा येणार नाही. इच्छा असल्यास त्यात आकृत्या/चित्र समाविष्ट करता येतील. लेखकाची शैली उत्तम असेल नि विद्यार्थी आवडीने वाचू शकत असतील, तर पानांची मर्यादा वा इतर नियम डावलल्यास हरकत नाही! :)
आमची आपेक्षा-१:
१. आजमितीस आठ लेख तयार आहेत, पैकी पाच इंग्रजी नि मराठी, दोन्ही भाषांत आहेत. मात्र हा उपक्रम २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात राबवण्याकरीता नवे लेख हवे आहेत. तुमच्या "Areas of Experties" मधील विषयावर तुम्ही लिहू शकता.
आमची आपेक्षा-१:
१. आजमितीस आठ लेख तयार आहेत, पैकी पाच इंग्रजी नि मराठी, दोन्ही भाषांत आहेत. मात्र हा उपक्रम २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात राबवण्याकरीता नवे लेख हवे आहेत. तुमच्या "Areas of Experties" मधील विषयावर तुम्ही लिहू शकता.
लेख मराठी नि इंग्रजी दोन्ही भाषांत हवेत. विषयनिवडीकरीता तुमचे स्वातंत्र्य घ्या. शास्रीयच विषय हवा, असे नाही. ज्ञान-संगीत-कला-विज्ञान-भाषा जे जे काही आहे त्यातील लेखांचे मोती निवडून शाळेतील मुलांसमोर ठेवायचे आहेत. केवळ इंजिनीअरींग, बी एस्सी, डॉक्टर हेच नाही तर अनंत व्यवसाय नि अनंत ज्ञानशाखा जगात आहेत. अशा सगळ्यांच शाखातील ज्ञान मुलांच्या नजरेसमोर येऊ द्यात.
२. लेखाचा विषय "आधुनिक" वा अपारंपरिक हवा आणि तरीही तो रंजक व वास्तववादी होईल याची काळजी घ्यावी.
आपल्याकडील गणितावरचे लिखाण हे श्री भास्कर, श्री आर्यभट्ट नि रामानुजन यांची जीवन चरित्रे, त्रिकोण-चौकोन-वर्तुळ- पाय= π याबाहेर आलेलेच नाही असे काही वेळा वाटते. आधुनिक जगात जे तंत्रज्ञान वापरतो त्याच्या आणि शालेय जीवनातील पाठ्यापुस्तकातील ज्ञानाचा काहीच संबंध नाही, असे बर्याचदा वेळा वाटते. खरंतर शालेयच नाही, तर मास्टर्स लेव्हलच्या पुस्तकांतील ज्ञानाचाही तोजच्या आयुष्याशी संबंध लावता येत नाही! ही दरी भरून काढण्याचे काम आपला लेख करू शकला, तर उत्तमच! त्याकरीता ज्ञानशाखांतील अपारंपारीक, आधुनिक विषयांवर वास्तववादी लिखाण केले, तर छान होइल. आपला लेख वाचलेली मुलगी/मुलगा जर उद्या कर तो मुलगा इंजिनिअर म्हणून ऑन -साईट गेला, नि काम पाहून तिला/त्याला लेख आठवला तर ते आपले यशच!
३. भाषा आणि कलाविषयांतील मित्रमैत्रिणींना लिखाण कशावर करु, असा प्रश्न होता. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर काही पर्यत देतोय:
जर्मन -फ्रेंच भाषा शिकवणारे लोक वर्गात खूप सुंदर खेळ घेतात. असाच एखादा भाषिक खेळ, जो कोकणातल्या किंवा बीड जिल्ह्यातील मुली-मुलांना कमीत कमी साधने वापरून बनवता येईल, यावर तुम्हाला लिहिता येईल. परदेशी भाषेतील आणि भारतीय भाषांतील साम्य दाखवून भाषेच्या शास्त्रीय अभ्यासात ज्या फ्यामिलीज (इंडो-योरोपिअन, रोमानिक इत्यादी) वापरल्या जातात त्याची तोंड ओळख करून देत येइल. ग्रीमबंधूच्या कथा, गोएथचे काम, फ्रेंच राज्यक्रांतीच्या जाहीरनाम्यातील एखाद्या कलमाचा सुंदर अर्थ लावणे हे करणे शक्य अहे. प्रयोगशाळेतील लोक सोपे प्रयोग शोधून लिहू शकतात.
४. लेखांचे अधिकार लेखकाधीन आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, ना कोणते पाऊल उचलले जाईल.
या लेखांचे मी काय करणार:
१. संपादन.
२. कोकण, उत्तर सोलापूर, फलटण अशा गावात आपले काही सुहृद आहेत.
दर महिन्यातून एका लेखाची त्यांना Soft copies पाठवली जाईल. ती छापून घेऊन शाळेतील मुलांस पोचवतील.
मुंबईच्या उमा काकू मुलांना या लेखावर आधारीत प्रश्नामाजुषा किंवा रिपोर्ट बनवायला सांगण्याचा विचार करताहेत. यातील बरेचसे सर्वजण छापण्याचा खर्च स्वतः करणार आहेत. वर्षभराने आढावा घेऊन पुढचा बेत आखू.
आमची आपेक्षा-२:
आपण लेख पाठवू शकला नाहीत, तरी ते मुलांपर्यंत पोचवू शकता.५. आपल्या गावाकडे आपली बालपणीची शाळा म्हणा, मुला-मुलीची शाळा म्हणा किंवा आपण एखाद्या समाजसेवी संस्थेसबत निगडीत असल्यास ही संस्था काम करत असलेली(ल्या) शाळांत आपण चौकशी करू शकता. या शाळा तयार झाल्यास, मला एक इमेल पाठवा (किंवा या ब्लॉगपोस्टखाली आपले Google+वापरून कमेंट लिहा). दरमाह एक लेख तुम्हाला मेल केला जाईल.
६. हे लेख शाळेपोचवण्यासाठी छापणे इ. कामांची जबाबदारी नि खर्च आपला. आम्ही कोणीही लेखक, भाषांतरकार, संपादक व इतर लोक कोणत्याही कार्याबद्दल काहीही मानधन नाही घेत नाही आहोत. या प्रकल्पात कोणतीही आर्थिक देवाणघेवाण आपेक्षित नाही.
या लेखन प्रकल्पाचे भविष्य:
भविष्याबाबत आपण खात्री देऊ शकत नसलो तरी बेत आखू शकतो. त्यामुळे या मथळ्याखालील चर्चा "जर-तर" अशीच घ्या.
१. काही जणांनी, हे लेख घेऊन ब्लॉग लिहिण्याची संकल्पना दिली आहे. या ब्लॉग वर केवळ गणित, फिजिक्स असे न दिसता सर्वच ज्ञान शाखांचा सुंदर मिलाफ दिसू शकेल.
२. एकदा का PDF मिळाल्या, की त्या एकत्र जोडून उत्तम लेखांचा संग्रह करून ई-बुक बनवणे अवघड नाही. प्रकल्पाखेरीस प्रत्येकाच्या घरात ठेवण्यासाठी एक अतिशय सुंदर पुस्तक बनेल अशी माझी खात्री आहे. काही नाही तर आपल्या घरातील जिज्ञासू मेंदुना आणि चिमुरड्यांना चघळायला उत्तम साहित्य मिळेल!
प्रकल्पाची आजमितीस झालेली वाटचाल:
१. २०१५-२०१६ करीता मराठीत लेख तयार झाले. जून ११, २०१५ ला पासून दरमाह एक लेख पाठवायला सुरूवात झाली.
२. मराठीतील "गणिती" या सुप्रसिद्ध पुस्काच्या सहलेखिका प्रा. माधवी ठाकूरदेसाई या प्रकल्पात सहभागी झाल्या.
३. "प्रथम" या संस्थेने (या संस्थेच्या संकेतस्थळावर जाण्याकरीता इथे टिचकी मारा) हे लेख त्यांच्या नंदुरबार, विदर्भ, धुळे येथील विद्यार्थांकरीता पाठवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी हे लेख हिंदीमधे भाषांतरीत करून उत्तर भारतात पाठवण्याचा मानस व्यक्त केला.
४. हा प्रकल्प मल्याळममधे भाषांतरीतकरण्याकरीता व केरळमधे राबवण्याकरीता अरूल गणेश आणि डॉ. दिवाकरन दि. यांनी पुढाकार सुरूवात केली.
४. हा प्रकल्प मल्याळममधे भाषांतरीतकरण्याकरीता व केरळमधे राबवण्याकरीता अरूल गणेश आणि डॉ. दिवाकरन दि. यांनी पुढाकार सुरूवात केली.
∆ ∆
१. सध्या या प्रकल्पात गुंतला असल्याने ब्लॉगवर लिहीणे मला शक्य होत नाहीये. मात्र दिवाळीच्या सुट्ट्या वगळता प्रत्येक महिन्याच्या अखेरीस या लेखांतील नवा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. हा लेख वाचण्याकरीता
वरील दुव्यावर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवा लेख टाकला जाईल आणि आपण तो वाचू शकता नि डाउनलोडही करू शकता.
२. या लेखाचा मूळ मसुदा लिहीण्यात प्रद्युम्ननने मदत केली. त्याबद्दल धन्यवाद!
No comments:
Post a Comment