Friday, January 25, 2013

उपोद्घात


यथा शिखा मयूराणां नागानां मणयो यथा |
तद्वद्  वेदाङ्गशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् ||
                           
अर्थ: ज्या प्रमाणे, मोरांच्या मस्तकी तुरा, नागांच्या मस्तकी नागमणी, त्याचप्रमाणे, 
वेदांगांच्या शिरोभागी गणित शोभून दिसते.


गणित या विषयावर बर्याच थोरामोठ्या लेखकांनी बरेच लिहून ठेवलेय. ते एकतर काहीतरी नकारार्थी किंवा फारच गहन नि उदात्त  अशाच स्वरुपाचं आहे. पण गणित करणार्या लोकांनी मात्र, त्याला सामान्यांच्या जवळ आणण्याचा पर्यत्न शक्यतो केला नाही. गणित करणार्या आम्ही लोकांनीच हे गहन, क्लिष्ट, "ऍबस्ट्रॅक्ट" आहे असं म्हणत वेगळं पाडलं.
असे हे शास्त्र मला जे काही थोडेफार उमगले, त्याच्या बळावर, पुन्हा जास्तीत जास्त लोकांना कळेलसं सांगण्याचा, त्यातील गमती जमती नि विचार सांगण्याचा आणि (माझे गणितातील वय फरसे नसूनही) या विषयाचे तत्वज्ञान सांगण्याचा हा एक प्रयत्न.

4 comments:

 1. गणितावर मराठी ब्लॉगचा हा जगातला पहिलाच प्रयत्न असावा. हार्दिक शुभेच्छा. इथे नियमित भेट देत जाईन.

  ReplyDelete
 2. Wow..! Sahi..! Shubhechha rohya!

  ReplyDelete
 3. पंकजजी- मी महीन्यातून एक तरी पोस्ट टकण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद!

  @हेम्या- :D धन्यवाद रे!!

  ReplyDelete
 4. गणितातील वाटचालीसाठी शुभेछा .

  ReplyDelete