Wednesday, November 5, 2014

आजीची गोधडी- चित्रफिती

मॅनीफोल्ड ही गणितामधील एक महत्वाची संकल्पना आहे. प्रस्तुत चित्रफितींमधू, मॅनीफोल्डस् ची ओळख करून देण्याचा प्यत्न केला आहे. तूर्तास, "आजीची गोधडी" ही तीन चित्रफितींची मालिका असेल, असा बेत आहे. मॅनीफोल्ड हे भूमिती नि भौतिकशास्त्रामधील अतिशय महत्वाचे साधन आहेत. मॅनीफोल्ड ही संकल्पना, त्या मानाने बरीच आधुनिका आहे. भारतीय गणितामधे अशा संकल्पनेचा अभ्यास केला गेला नाही. त्यामुळे भारतीय भाषांमधे 'मॅनीफोल्ड' ला प्रतिशब्द नाही! या चित्रफीतींमधे, मॅनीफोल्डला मराठीत 'गणिती गोधडी' असा प्रतिशब्द सुचवला आहे.

गणिती गोधड्यांचा अभ्यास करण्यासाठी बरीच तांत्रिक सामग्री लागते. मात्र, जास्तीत जास्त प्रेक्षकांना या संकल्पनेची निदान तोंडओळख व्हावी, म्हणून कमीत कमी तांत्रिक माहिती वापरण्याचा प्रयत्न मी केला आहे. तरी सुद्धा, तुम्हाला या चित्रफिती किचकट वाटल्या, तर माझे प्रयत्न कमी पडले, हे समजून घ्या. तसेच, काही वेळा एखादे स्पष्टीकरण देताना, बोलण्याचा वेग जास्त असेल नि समजण्यात अडचण आली, तर थांबून थांबून व्हिडीओ पहावा! वक्त्याच्या स्पष्टीकरणाचा वेग नि ते स्पष्टीकरण समजून घेण्याचा प्रेक्षकांचा  वेग, सारखाच असेल, असे नाही.
क्लिष्टता टाळण्यासाठी, बर्याच गणिती संकल्पना सांगण्याऐवजी, त्यांचे दृष्टांत दिले आहेत. वाचकांनी लक्षात ठेवावे, की हे दृष्टांत आहेत, नि व्याख्या नाहीत! याच कारणामुळ, गणिती लोकांना कदाचित या चित्रफिती खटकू शकतात. मात्र, कोणत्याही संकल्पनेशी प्रतारणा करण्याचा माझा हेतू नाही! :) व्याख्येऐवजी "दृष्टांत" देण्याच्या आगाउपणाबद्दल, गणिताच्या लोकांनी क्षमा करावी!
अखेरीस सांगायचा मुद्दा हा की, या चित्रफितींचा हेतू, निव्वळ मनोरंजन नसून ज्ञानवर्धन हा सुद्धा आहे. त्यामुळे (खासकरून विद्यार्थांनी) काही संज्ञा, व्याख्या न समजल्यास, विकीपिडीया वा खालील संदर्भ चाळून स्वतःच ही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला  तर हा प्रयोग सार्थकी लागला असे म्हणायला हरकत नाही! म्हणतात ना
क्षणशः कणश्चैव विद्यामर्थम च साधयेत।
तसे काहीसे!

हे भाग बनवताना, त्यातील क्लिष्टतेवर अभिजीत (बोरकर) नि शंतनूने शांततेने जोरदार हल्ला चढवला. संमतीने मनमोकळेपणे नकारार्थी प्रतिक्रीया दिल्या! त्यामुळे, बरीच सुधारणा केलेले हे व्हिडीओ प्रेक्षकांसमोर आले आहेत. या सर्वांचा मी आभारी आहे! :)

या मालिकेमधील पहीला भाग प्रसारीत झाला आहे. 
पहील्या भागातील गणिताचा तिखटपणा- ५ पैकी २ मिरच्या

युट्युबवरील चित्रफितींखालील "Description" वाचलेत, तर उत्तम!

भाग-१
हा भाग पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.

भाग-२
हा भाग पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
https://www.youtube.com/watch?v=jgNvYrbF4nQ&list=UUiE_z-U0hscXnZe8AYYmEtQ&spfreload=10


तुमच्या सकारात्मक-नकारात्म प्रतिक्रीया, सूचना, तुम्हाला पडलेले प्रश्न हे चित्रफितीखालील Comments मधे जरूर लिहा.

∆  ∆

2 comments:

  1. An exciting introduction to manifolds. Interestingly enough, whenever I explain manifolds I always talk of quilts. According to me the Marathi term you have coined is spot on. I will watch the video once more to give you more constructive feedback.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Priyavrat! Your input would be valuable.
      Sometimes ago I found the word "बहुवळ्या" used for Manifold, in a Marathi article. I thought बहुवळ्या is a literal translation, it looks very artificial and gives no idea about what it is! And then I came up with this word. Then I found out, that when I used this word in discussions, student and my friends from Physics could relate Manifolds to something concrete.
      Will wait for your comments.

      Delete